एकनाथ शिंदे ६२व्या वर्षीही फिट! कशी आहे लाइफस्टाईल? काय खातात, काय पितात?

Anushka Tapshalkar

वयाच्या ६२व्या वर्षीही फिट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. त्यांच्या फिटनेस रुटीनमधून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.

Eknath Shinde Fitness at 62

|

sakal

रोज ६० मिनिटे वर्कआउट

एकनाथ शिंदे दररोज जवळपास १ तास व्यायाम करतात. त्यांच्या रुटीनमध्ये कार्डिओ, बॉडीवेट एक्सरसाइज, कोअर आणि लोअर बॅक वर्कचा समावेश आहे.

Daily 60 Minute Workout

|

sakal

योगा आणि पिलाटेज

वर्कआउटसोबतच योगा आणि पिलाटेजलाही ते महत्त्व देतात. यामुळे शरीराची लवचिकता आणि हालचाल टिकवून ठेवण्यास मदत होते.

Yoga and Pilates

|

sakal

घरच्या जेवणाला पसंती

फिटनेससाठी ते घरचे आणि साधे जेवण पसंत करतात. विशेषतः महाराष्ट्रीयन पदार्थ त्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत.

Preference to Homemade Food

|

sakal

नाश्ता

नाश्त्यामध्ये इडली, मेदू वडा, उपमा आणि कांदा पोहे असे पदार्थ ते खातात. कामानिमित्त बाहेर असतानाही घरचा डबा सोबत ठेवण्याला प्राधान्य देतात.

Breakfast

|

sakal

'या' पदार्थांना प्राधान्य

दुपारच्या जेवणात ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, चपाती, डाळ आणि स्थानिक हंगामी भाज्यांचा समावेश असतो. जंक फूड आणि अतिरिक्त साखरेपासून ते दूर राहतात.

Healthy and Balanced Diet

|

sakal

पुरेशी झोप आणि हायड्रेशन

फिटनेससाठी व्यायाम आणि आहारासोबत पुरेशी झोप घेणे आणि शरीर हायड्रेटेड ठेवणेही महत्त्वाचे आहे. शरीराला योग्य विश्रांती मिळाल्यास शरीर आणि मन दोन्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात.

Sleep and Hydration

|

sakal

सोनिया गांधी यांना कोणते पदार्थ आवडतात?

sonia gandhi

|

esakal

आणखी वाचा