Anushka Tapshalkar
नीलिभृंगादी तेलात निळी, भृंगराज, आवळा, ज्येष्ठमध आणि शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. हे तेल केसांना पोषण देण्यास, टाळूला थंडावा देण्यास आणि अकाली केस पांढरे होण्याची समस्या कमी करण्यास उपयुक्त मानले जाते.
Nilibhringadi Oil
sakal
आवळ्याचा वापर आज हेअर मास्क आणि शॅम्पूमध्ये केला जातो. मात्र, आयुर्वेदात पूर्वीपासूनच केसांच्या निगेसाठी आवळा वापरला जातो. त्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म केस व टाळूच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात.
Amla Oil
sakal
ब्राह्मी स्मरणशक्तीसाठी प्रसिद्ध असली, तरी आयुर्वेदात तिच्या तेलाचा वापर केसांच्या निगेसाठीही केला जातो. हे तेल टाळूचा कोरडेपणा कमी करण्यास आणि मसाजसाठी उपयुक्त मानले जाते.
Brahmi Oil
sakal
गुंजा वनस्पतीच्या बिया कच्च्या स्वरूपात विषारी असतात. विशिष्ट शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच त्यांचा बाह्य वापर केला जात असे. त्यामुळे गुंजा तेल घरच्या घरी बनवू नये आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावे.
Gunja Oil
sakal
ज्येष्ठमधाचा वापर घशाच्या समस्यांसोबतच केसांच्या निगेसाठीही केला जातो. त्यातील तेलाचा गुणधर्म टाळूचा कोरडेपणा कमी करून केस मऊ ठेवण्यास मदत करतात.
Jyeshthamadh Oil
sakal
केसांच्या निगेसाठी आयुर्वेदात भृंगराजसोबत आवळा, ब्राह्मी आणि ज्येष्ठमध यांसारख्या वनस्पतींचाही वापर केला जात असे. त्यांच्या गुणधर्मांनुसार विविध आयुर्वेदिक तेलं तयार केली जात होती.
Importance of Oils in Ayurveda
sakal
प्रत्येक तेल सर्वांना सूट होईलच असे नाही. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि गुंजासारख्या विषारी वनस्पतींचा घरगुती वापर टाळा.
Precautions to Take Before Use
sakal
Dry skin
sakal