पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता नकोशा वाटतात? मानसिक आरोग्याचे ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका!

Aarti Badade

मन अस्वस्थ असण्यामागे काय कारण?

शरीर निरोगी असूनही सतत थकवा, चिडचिड आणि उदासीनता जाणवत असेल, तर हे मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात.

अ‍ॅलेक्सिथायमिया म्हणजे काय?

स्वतःला नेमकी कोणती भावना जाणवत आहे, हे ओळखता किंवा व्यक्त करता न येण्याच्या अडचणीला अ‍ॅलेक्सिथायमिया म्हणतात.

सतत चिंता आणि नकारात्मक विचार

भविष्याची अतिप्रमाणात काळजी वाटणे, सतत नकारात्मक विचार येणे, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्या ही चिंताविकाराची संभाव्य लक्षणे आहेत.

बर्नआऊट म्हणजे मानसिक थकवा

कामाचा सततचा ताण, प्रचंड थकवा, कामापासून दुरावा आणि कार्यक्षमतेत घट जाणवणे ही बर्नआऊटची प्रमुख लक्षणे आहेत.

आवडत्या गोष्टींतून आनंद मिळत नाही?

पूर्वी आवडणारे छंद, संगीत, फिरणे किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे निरर्थक वाटू लागल्यास त्याला अ‍ॅन्हेडोनिया म्हणतात.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

उदासीनता, चिडचिड, झोप आणि भुकेतील बदल अशी लक्षणे दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्याल?

स्वतःच्या भावनांना समजून घ्या, जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा आणि गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञ किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची मदत घ्या.

चाणक्य नीती! नातं शेवटपर्यंत टिकवण्यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा!

chanaky niti

|

Sakal

येथे क्लिक करा