Anushka Tapshalkar
मेकअप हा आपल्या सौंदर्याला उजाळा देण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठीचं एक साधन आहे. स्त्रिया दररोज ऑफिसला जाताना, कार्यक्रमाला जाताना मेकअप करतात.
मेकअपचा सारखा वापर त्वचेला खराब करू शकतो. त्यामुळे नैसर्गिक उपाय करणे फायदेशीर ठरते.
खोबरेल तेल हे दैनंदिन जीवनात त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि सहज वापरता येणारे आहे. त्यामुळे खोबरेल तेलाचा मेकअप करतेवेळी वापर केल्यास फायदेशीर ठरु शकते.
मेकअप लावण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला खोबरेल तेल लावा. ते नैसर्गिक मॉइश्च्युरायझरचे काम करेल.
चिकबोन्स वर थोडेसे खोबरेल तेल लावा. त्यावर कोणतीही आयशॅडो किंवा पिगमेंट वापरून किंचित पॉपी लुक तुम्ही करू शकता. खोबरेल तेल हे पिगमेंट किंवा आयशॅडो चमकवायला मदत करते आणि नैसर्गिक चमक देते.
ओठांवर थोडेसे खोबरेल तेल लावा. त्यावर तुमच्या आवडीची लिपस्टिक लावून वरून पुन्हा थोडे तेल स्मज करा. यामुळे तुमच्या ओठांना एक टिंटेड लुक मिळेल.
खोबरेल तेलात कापूस किंवा कॉटन पॅड बुडवा आणि नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणू या तेलाचा वापर करा. यामुळे कोणताही वॉटरप्रूफ मेकअपही काढता येईल.
तुमचा ब्रश खोबरेल तेलात बुडवून नीट साफ करा आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
सर्वोत्तम परिणामांसाठी नेहमी (virgin) ताजे आणि शुद्ध खोबरेल तेल वापरा, कारण ते तुमच्या त्वचेसाठी सौम्य आणि प्रभावी असते.