Anushka Tapshalkar
प्रदूषण, ताण, चुकीचा आहार आणि केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्समुळे केस गळण्याची समस्या वाढते. अशावेळी काही योगासने केसांच्या मुळांना नैसर्गिक पोषण देण्यास मदत करू शकतात.
Long, Strong and Thick Hair
sakal
या आसनात डोके खाली आणि शरीर उलट्या 'V' आकारात असते. त्यामुळे टाळूकडे रक्तप्रवाह वाढतो, केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि ताणही कमी होतो.
Adho Mukha Svanasana
योगातील महत्त्वाचे आसन मानले जाणारे शीर्षासन टाळूमधील रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते. त्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. नवशिक्यांनी हे आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
Sirsasana
sakal
फॉरवर्ड बेंड पोझमुळे डोक्याकडे ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा वाढतो. तसेच ताण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे केस गळती कमी होण्यास हातभार लागू शकतो.
Uttanasana
sakal
दोन्ही हातांच्या नखांना एकमेकांवर घासण्याचा हा सोपा व्यायाम आहे. यामुळे टाळूतील नसांना उत्तेजना मिळते आणि केसांच्या मुळांना सक्रिय होण्यास मदत मिळू शकते.
Balayam Yoga
sakal
जेवणानंतर केले जाणारे वज्रासन पचन सुधारण्यास मदत करते. योग्य पोषण मिळाल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत होऊ शकते.
Vajrasana
sakal
नियमित योगासोबत संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताणमुक्त जीवनशैलीही केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे.
Healthy Routine for Healthy Hair
Sakal
केसांच्या वाढीवर योगाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, मात्र तो व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो. केस गळती किंवा टाळूच्या गंभीर समस्यांसाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Superfoods to Naturally Grow Strong & Healthy Hair
sakal