Anushka Tapshalkar
पावसाळ्यातील दमट हवामान, थंडी आणि हवामानातील चढ-उतार यामुळे सांधेदुखी, जडपणा वाढतो. संधिवात असलेल्या रुग्णांमध्ये वेदना आणि हालचालींची अडचण अधिक जाणवते. या वेळी योगासने फायदेशीर ठरू शकतात.
बालासन म्हणजे आरामदायक स्थिती. ही मुद्रा मांड्या, नितंब आणि घोट्यांना सौम्य ताण देते. तणाव कमी करते आणि संधिवातामुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यात मदत करते.
पाठीच्या कण्याला लवचिकता देणारी ही मुद्रा पाठदुखी आणि मानेतील तणाव कमी करते. संधिवातामुळे होणारी जडपणा आणि वेदना यावर ही हालचाल उपयुक्त ठरते.
संपूर्ण शरीराला ताण देणारी मुद्रा. हॅमस्ट्रिंग्स, पाठीचा कणा, वासरे यांना लवचिकता मिळते. रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी होते.
हा आसन पायांचे स्नायू बळकट करतं, नितंब आणि कंबर लवचिक करतो. संधिवातामुळे हालचाल मर्यादित होत असेल, तर हा आसन उपयोगी आहे.
पाठीचा कणा, नितंब आणि पाय यांचे बळकटीकरण करणारी मुद्रा. पोस्चर सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे संधिवातातील वेदना कमी होतात.
पूर्ण विश्रांती देणारी ही मुद्रा मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करते. संधिवाताच्या वेदनांपासून थोडा वेळ आराम मिळवण्यासाठी शवासन आवश्यक आहे.
AIIMS दिल्लीच्या संशोधनानुसार, नियमित योगाभ्यास केल्याने संधिवात रुग्णांची लवचिकता वाढते, वेदना कमी होतात आणि एकूण आरोग्य सुधारते.
ही सर्व योगासने घरी सहज करता येतात. अनुभवी योगशिक्षकाकडून मार्गदर्शन घेऊन दररोज काही वेळ द्या. पावसाळ्यातील वेदना दूर करण्यासाठी मदतीचा ठरू शकतो.