सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात भूक कमी होणे एक सामान्य समस्या असू शकते. परंतु कवठ खाल्ल्याने ही समस्या दूर होऊ शकते.
कवठाचे फळ पचनासाठी लाभकारी आहे. उन्हाळ्यात हे फळ शरीरासाठी अत्यंत आरोग्यवर्धक आहे.
अतिसार झाल्यास कवठ खाणे जुलाब थांबवण्यासाठी मदत करते.
कवठ मूळव्याध आणि अल्सर यासारख्या व्याधींवर उपयुक्त ठरते.
हृदयरोग किंवा छातीत धडधडणारे लोकांसाठी कवठ खाणे फायदेशीर ठरते.
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी कवठ खाणे फायदेशीर असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
कवठ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर अधिक निरोगी राहते.
कवठ एक उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार यासारख्या विकारांवर उपयुक्त आहे.
पिकलेले कवठ खा. कच्च्या कवठामुळे सर्दी, खोकला, आणि डोकेदुखी होऊ शकते.