सकाळ डिजिटल टीम
आजकाल, हॉटेल्स आणि पॉश ठिकाणी फळं सोलून कापून खाल्ली जातात. पण सालींमध्ये असतात अनेक आरोग्यदायक गुण.
फळांच्या सालीत जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. सालींमध्ये असलेल्या पोषणमूलक घटकांची उपेक्षा करू नका.
पेरूच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. ते सालीसकट खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे.
सफरचंदाच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. रोज एक सफरचंद सालीसकट खाल्ल्याने आरोग्य सुधारते.
किवी हाडांसाठी फायदेशीर आहे, ते तणाव कमी करतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
सालीत असलेल्या पोषणमूलक घटकांमुळे, तुम्ही फळे सालीसकट खा.
फळांच्या सालींचा उपयोग आरोग्यासाठी करा आणि त्यांची चांगली पोषणतत्त्वे मिळवा.