सकाळ डिजिटल टीम
पालकच्या रसामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.
पालकमध्ये लोह असते, जे रक्ताच्या लाल पेशी तयार करण्यात मदत करते. अॅनिमियाचा त्रास दूर होतो.
पालक क्षारयुक्त आहे, त्यामुळे संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो.
पालक मध्ये फायबर असते, जे पचनसंस्था सुधारते. बद्धकोष्ठता आणि अल्सरपासून आराम मिळवता येतो.
व्हिटॅमिन के च्या मदतीने हाडे मजबूत होतात त्यामुळे कॅल्शियम हाडांच्या आत घट्ट राहण्यास मदत होते.
पालकचा रस त्वचेची चमक वाढवतो. सुरकुत्या आणि काळी वर्तुळे कमी होतात.
पालकचे रस केसांची वाढ आणि मजबुती वाढवतो. पातळ होणाऱ्या केसांसाठी फायदेशीर आहे.