सकाळ डिजिटल टीम
तासन्तास स्क्रीनसमोर काम करणे, सततच्या मीटिंग्ज आणि मर्यादित शारीरिक हालचाली यामुळे शारीरिक थकवा जाणवत असतो.
खुर्चीत बसून काम करताना, ३०-४५ मिनिटांनी पाठीचा कणा सरळ करून स्ट्रेच करा. मान डाव्या-उजव्या वळवा, खांदे गोल फिरवा आणि हातांची बोटे ताणून सोडा.
ऑफिसमध्ये किंवा घरी, जिथे जागा असेल तिथे डाऊनवर्ड ‘डॉग पोझ’ करा. यामुळे शरीराला ताण मिळतो आणि ऊर्जा वाढते.
रोज सकाळी फक्त पाच-सात सूर्यनमस्कार घातल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर हलके आणि ताजेतवाने वाटते.
खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. प्राणायाम (उदाहरणार्थ, अनुलोम-विलोम) करून शरीर ऊर्जावान ठेवा.
थकवा आणि ऊर्जा कमी होण्याचे एक कारण म्हणजे पाण्याची कमी. पर्याप्त पाणी पिणे शरीरातील ऊर्जा आणि कार्यक्षमता सुधारते.
थोड्याशा शारीरिक हालचाली आणि स्ट्रेचेसने थकवा कमी करा आणि कामाच्या दरम्यान ऊर्जा वाढवण्यासाठी वेळ द्या.