Anushka Tapshalkar
कॅल्शियम केवळ हाडे आणि दात मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर स्नायू, मज्जासंस्था आणि शरीराची वाढ यांसाठीही आवश्यक आहे.
लहानपणी पुरेसा कॅल्शियम मिळाल्यास हाडे ठिसूळ होणे आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका टाळता येतो. त्यामुळे आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
बरीच मुलं खाण्याच्या बाबतीत फार चोखंदळ असतात. अशा मुलांसाठी पुढे काही सोपे आणि चविष्ट कॅल्शियमयुक्त पदार्थ दिले आहेत.
पालक, मेथी आणि शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
नाचणी हा कॅल्शियमचा नई फायबरचा उत्तम स्रोत आहे. नाचणी पचनासाठी चांगली असून मुलांना जास्त वेळ ताजेतवाने आणि तृप्त ठेवते.
टोफू, सोया मिल्क आणि सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रथिने असतात, जे शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहेत.
बदाम आणि अक्रोड हे कॅल्शियम व हेल्दी फॅट्सचे उत्तम स्रोत आहेत. मात्र, लहान मुलांमध्ये गिळण्याचा धोका आणि अॅलर्जीचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी.
चण्यामध्ये भरपूर कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर असते. यामुळे मुलांना दीर्घकाळ एनर्जेटिक आणि प्रसन्न राहण्यास मदत होते.
मासे कॅल्शियम आणि मेंदूला उपयुक्त असलेल्या ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सने समृद्ध असतात.
या पदार्थांचा समावेश आहारात केल्यास मुलांची हाडे मजबूत राहतील, ते अधिक सक्रिय होतील आणि त्यांच्या एकूणच आरोग्यास फायदा होईल.