Anushka Tapshalkar
जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी आपण हमखास जायफळ वापरतो.
शरीरायासाठी उपयुक्त असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टरीअल गुण जायफळात आढळतात.
जायफळाचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया...
तुमच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर सूज आले असेल तर जायफळाच्या पाणायचे सेवन केल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
जायफळात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
तुम्हाला जर दररोज झोप लागण्यास अडथळा येत असेल तर जायफळाचे पाणी प्या. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल.
जायफळाचे पाणी आपले पाचं सुरळीत करण्यास मदत करते. तुम्हाला जर अपचनाचा त्रास होत असेल तर जायफळाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
जायफळाच्या पाण्याने रोग प्रतिकारशक्ती सुधृढ होण्यास मदत होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.