Anushka Tapshalkar
उन्हाळा तितकासा अल्ल्हाददायक नसला तरी लहान मुलांना सर्वात जास्त ओढ याच ऋतूची असते, कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाता येतं.
परंतु बऱ्याचदा बजेट फ्रेंडली ठिकाणंच सापडत नाहीत. पण टेन्शम घेऊ नका. कारण आम्ही पुढे पुण्यातील अशी ठिकाणं दिली आहेत जिथे तुम्ही फक्त 100 रुपयाच्या आत भेट देऊ शकता.
तुम्ही जर कलाप्रेमी असाल किंवा मुलांमध्ये कलेची आवड निर्माण करायची असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच! इथे विविध प्रकारच्या कलाकृती पाहायला मिळतात. सूर्यास्ताचा सुंदर नजारा बघण्यासाठी दुपारी भेट द्या.
पुण्याचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी ही एक प्रसिद्ध टेकडी आहे. येथे पेशवा संग्रहालय (प्रवेश ₹20) आणि शांत देवडेश्वर मंदिर पाहायला मिळते. इतिहासप्रेमींनी इथे जरूर भेट द्यावी.
शहरापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. पहाटे भेट दिल्यास सुर्योदयाच्या वेळी धरणाचं दृश्य खास अनुभवता येतं.
पेशव्यांच्या काळातील सौंदर्य अनुभवण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. इथला गार्डनमधून दिसणारा निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू मनाला मोहवतात. भेट देण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार.
शिंदे घराण्याच्या स्मरणार्थ उभारलेली ही एक भव्य आणि सुंदर वास्तू आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्ही संध्याकाळी तिथल्या भेटीच्या वेळेच्या आत जावे.
हे ठिकाण निसर्गरम्य आहे, आणि पावसाळ्यात खास सुंदर दिसतं. उन्हाळ्यात सूर्योदयापूर्वी भेट दिल्यास उष्णतेपासून बचाव होतो आणि शांतता आणि सूर्योदय अनुभवता येतो.