Anushka Tapshalkar
भारतीय चित्रपटांनी अनेक सुंदर ठिकाणे दाखवली, जी नंतर लोकप्रिय पर्यटन स्थळे बनली. पुढे अशी ८ ठिकाणे दिली आहेत जी चित्रपटांमुळे प्रसिध्द झाली आहेत.
3 इडियट्स चित्रपटातील करीन कपूरचा स्कूटर सीन आणि चित्रपटाच्या यशामुळे पँगॉन्ग लेक जगभर प्रसिद्ध झाले. आता हे हिमालयातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
दिल चाहता है चित्रपटातील आमिर, सैफ आणि अक्षय खन्नाचा आयुष्याबद्दल चर्चा करणारा सीन चापोरा फोर्टवर चित्रित झाला. यामुळे गोव्यातील हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय झाले.
केरळमधील सर्वात मोठा धबधबा बाहुबली चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला. याला ‘बाहुबली धबधबा’ म्हणतात आणि येथे अनेक पर्यटक आवर्जून जातात.
अरुणाचल प्रदेशातील शोंगा-त्सेर लेकला माधुरी लेक असे नाव कोयला चित्रपटातील माधुरी दीक्षितच्या सीनमुळे देण्यात आले. हे तवांगमधील शांत आणि सुंदर ठिकाण आहे.
जब वी मेट चित्रपटातील करिना कपूर आणि शाहिद कपूरचे सीन रोहतांग पासवर चित्रित झाले, ज्यामुळे हे बर्फाच्छादित ठिकाण प्रसिद्ध झाले.
युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये सामील असलेल्या या भव्य रेल्वे स्थानकाला स्लमडॉग मिलियनेयर चित्रपटाने जागतिक ओळख दिली.
ये जवानी है दिवानी चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या प्री-वेडिंग सीनमुळे उदयपूरचे तलाव आणि शाही ठिकाणे अधिक प्रसिद्ध झाली.
रंग दे बसंती चित्रपटातील महत्त्वाचे सीन हुमायून्स टॉंबवर चित्रित झाले, ज्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला अधिक प्रसिद्धी मिळाली.
डियर जिंदगी चित्रपटातील आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या सायकलिंगच्या दृश्यामुळे हा रस्ता प्रसिध्द झाला आहे.