Anushka Tapshalkar
उत्तम आरोग्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी दैनंदिन सवयीनमध्ये काही बदल केले तर ते फायदेशीर ठरतं.
झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिणं टाळा. यामुळे तुमची झोप विस्कळीत होऊ शकते.
नियमित व्यायाम केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबत चांगली झोप लागायलाही मदत होते.
ताण तणावामुळे झोपेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित ध्यान आणि योग करून ताण तणावाचे नियोजन करा. यामुळे तुम्हाला रात्री छान झोप लागेल.
आहारात मेलाटोनिनयुक्त पदार्थांचा जसे की फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ.
रात्रीचे जेवण हलके, कमी तेल व मसाल्यांचे करा. यामुळे पचनही नीट होते आणि झोप व्यवस्थित लागते.
रोज एकाच वेळी झोपायला जा आणि एकाच वेळी उठून ७-८ तासांची झोप घ्या.