Anushka Tapshalkar
अनेकजण बऱ्याचदा फॅडच्या नावाखाली, ट्रेंडचा भाग म्हणून किंवा दुसऱ्यांचे ऐकून फक्त पाणी पिऊन उपवास करतात. पण हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? किंवा याचे शरीरावर काही विपरीत परिणाम होतात, असे प्रश्न निर्माण होतात.
यानिमित्ताने सिडनी विद्यापीठाने संशोधन केले. या संशोधनात 20 प्रौढांनी 10 दिवस फक्त पाणी पिऊन उपवास केला आणि नंतर ५ दिवस परत खाण्याचा टप्पा पार केला होता.
उपवास केल्यामुळे केवळ 10 दिवसांत वजनात सुमारे 7.7% घट झाली आणि कमरेचा घेर ६% ने कमी झाला.
फक्त पाणी प्यायल्यामुळे CRP आणि IL-8 ही जळजळ वाढवणारी प्रोटिन्स वाढतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका असतो.
उपवासामुळे काही अल्झायमरशी संबंधित प्रोटीन कमी होतात, पण दीर्घकाळच्या स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर धोका निर्माण होऊ शकतो.
उपवास करणाऱ्यांना थकवा, डोकेदुखी, कमी रक्तदाब आणि झोपेचे विकार जाणवले. म्हणजेच हे शरीराला सहन करणे कठीण जाते.
उपवासामुळे शरीरात स्नायू आणि हाडे विघटित होण्याचे संकेत आढळले, म्हणजेच वजन कमी झाले तरी त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम झाले.
हृदय किंवा रक्तवाहिन्यांचे आजार असलेल्यांनी असा उपवास टाळावा – यामुळे धोका वाढू शकतो.
फक्त २० जणांवर अभ्यास झाल्याने परिणाम वैयक्तिक असू शकतात. अशा उपवासासाठी नेहमी वैद्यकीय देखरेखीची गरज असते.