विकेंडला ट्रेकिंगचा बेत आखताय? हिवाळ्यात 'या' 6 किल्ल्यांना आवर्जून भेट द्या!

Aarti Badade

हिवाळ्यात ट्रेकिंगची मजा काही औरच!

हिवाळ्यातील आल्हाददायक थंडी आणि स्वच्छ वातावरणामुळे पुणे व सह्याद्रीच्या परिसरातील किल्ल्यांवर ट्रेकिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Trekking Near Pune fort

|

Sakal

सिंहगड किल्ला

नवशिक्यांसाठी सिंहगड हा उत्तम पर्याय असून साधारण १ ते २ तासांच्या चढाईनंतर तानाजी कडा, विंड पॉईंट आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.

Trekking Near Pune fort

| esakal

कोरीगड आणि लोहगड किल्ला

कोरीगडावरील भक्कम तटबंदी आणि तलाव, तर लोहगडावरील प्रसिद्ध विंचूकाटा माची आणि पवना धरणाचे दृश्य ट्रेकर्सना आकर्षित करते.

Trekking Near Pune fort

|

Sakal

तिकोना किल्ला

पिरॅमिडसारखा आकार असलेला तिकोना किल्ला सोपा ते मध्यम स्वरूपाचा ट्रेक असून येथून पवना धरण आणि लोहगड-विसापूरचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.

Trekking Near Pune fort

|

Sakal

राजगड किल्ला

स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड अनुभवी ट्रेकर्ससाठी उत्तम पर्याय असून पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माचीचे सौंदर्य अनुभवता येते.

Trekking Near Pune fort

|

Sakal

तोरणा किल्ला

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंच किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरण्यावर चढाई आव्हानात्मक असून झुंजार माची आणि बुधला माचीवरून सह्याद्रीचे विहंगम दृश्य दिसते.

Trekking Near Pune fort

|

Sakal

ट्रेकिंगला जाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

ट्रेकिंगला सकाळी लवकर सुरुवात करा, सोबत पुरेसे पाणी, चांगल्या ग्रिपचे शूज आणि उबदार कपडे ठेवा तसेच आपल्या क्षमतेनुसार ट्रेकची निवड करा.

Trekking Near Pune fort

|

esakal

महाराष्ट्रातील 'या' 5 किल्ल्यांवर पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्ती!

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

|

Sakal

येथे क्लिक करा