डाएटमध्ये 'ही' फळं असतील तर कर्करोगाचा धोका होऊ शकतो कमी

Anushka Tapshalkar

कर्करोगाचा धोका कमी कसा होऊ शकतो?

अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेली काही फळं पेशींना संरक्षण देऊन कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

सफरचंद (Apples)

सफरचंदात क्वेर्सेटिन आणि फिनॉलिक संयुगे असतात, जी शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी हानिकारक पेशींची वाढ मंदावू शकतात.

Apples 

|

sakal

कीवी (Kiwi)

व्हिटॅमिन C ने समृद्ध कीवी पचनसंस्थेचे संरक्षण करते आणि पचनादरम्यान तयार होणाऱ्या घातक पदार्थांची निर्मिती कमी करते.

Kiwi

|

sakal

ब्लूबेरीज (Blueberries)

ब्लूबेरीजमधील अँथोसायनिन्स डीएनएचे नुकसान रोखतात आणि सूज कमी करतात, जे कर्करोगाच्या वाढीशी संबंधित घटक आहेत.

Blueberries

|

sakal

टोमॅटो (Tomatoes)

लायकोपीन या कॅरोटेनॉइडमुळे टोमॅटो पेशींच्या वाढीचे नियमन करतात आणि विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याशी जोडले गेले आहेत.

Tomatoes

| sakal

लाल द्राक्षं (Red Grapes)

रेस्व्हेराट्रॉलसारख्या पॉलीफेनॉल्समुळे लाल द्राक्षं कर्करोगी पेशींचा प्रसार रोखण्यास मदत करू शकतात; हीच पोषक द्रव्यं हिरव्या द्राक्षांतही आढळतात.

Red Grapes

|

sakal

अ‍ॅव्होकॅडो (Avocados)

आरोग्यदायी फॅट्स आणि फायबरने भरलेले अ‍ॅव्होकॅडो नियमितपणे खाल्ल्यास कोलोरेक्टल, फुफ्फुस व मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

Avocados

| Sakal

गॅस, पोटफुगी व पचन सुधारण्यासाठी रोज करा ‘ही’ ७ योगासनं

stomach bloating problem

|

sakal

आणखी वाचा