सकाळ डिजिटल टीम
गोड आंबट असे शहतूत हे फळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
शहतूत गुलाबी, जांभळे किंवा लाल रंगाचे असून ते वाइन, ज्यूस, जाम, सिरप इ. मध्ये वापरले जाते.
भारतात शहतूत मार्च-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हंगामात बाजारात मिळतात.
शहतूत मध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असतात, जे आरोग्य साठी अत्यंत फायदेशीर आहे.
शहतूताचा रस डोळ्यांसाठी खूप चांगला आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करण्यास मदत करते.
शहतूतमध्ये व्हिटॅमिन सी आणि खनिजे असतात, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.
शहतूत कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते. यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग इत्यादी धोके कमी होतात.
शहतूत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि इन्सुलिन चांगले कार्य करण्यास मदत करते.
शहतूताचे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे ते कर्करोग प्रतिबंधक ठरते.
शहतूतमध्ये व्हिटॅमिन K, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतात, जे हाडांना मजबूत करतात.
शहतूत त्वचेसाठी फायदेशीर आहे कारण त्यात व्हिटॅमिन A, E आणि कॅरोटीन असतात, जे त्वचा मऊ आणि काळे डाग दूर करण्यास मदत करतात.