सकाळ डिजिटल टीम
युरिक अॅसिड एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे, जो शरीरात नेहमीच असतो.
युरिक अॅसिडची निर्मिती शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे.
मूत्रपिंड युरिक अॅसिड शरीरातून बाहेर काढण्यासाठी कार्य करते.
जेव्हा मूत्रपिंड युरिक अॅसिड बाहेर काढण्यात अयशस्वी होतात, तेव्हा युरिक अॅसिडची पातळी वाढते.
युरिक अॅसिड कमी करण्याचे एक प्रमुख कारण आहे आपला आहार.
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात काही पिवळ्या गोष्टींचा समावेश करा.
लिंबू युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यात सायट्रिक अॅसिड आणि व्हिटॅमिन C असते, जे युरिक अॅसिडचे व्यवस्थापन करतात.
केळीमध्ये पोटॅशियम आणि पोषक तत्त्वे असतात, ज्यामुळे युरिक अॅसिडची पातळी कमी होऊ शकते.
अननसात जळजळ कमी करणारे एंजाइम आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे तत्त्व असतात, जे युरिक अॅसिड कमी करण्यात मदत करतात.
पिवळी शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात.
मूग डाळ युरिक अॅसिड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने शरीरातून युरिक अॅसिड बाहेर पडते.