विनयन वाघमारे
समुद्रात आढळणारा अवघ्या २ ते ७ इंचाचा 'पीकॉक मँटिस श्रिम्प' (Peacock Mantis Shrimp) दिसायला इंद्रधनुष्यासारखा सुंदर असला, तरी त्याच्या एका ठोशाने जाडजूड काचही चक्काचूर होते!
shrimp
Sakal
या जीवाचे पुढचे दोन हात हातोड्यासारखे (Dactyl Clubs) असतात. धनुष्याची दोरी ताणून सोडावी तशी तो आपल्या स्नायूंमध्ये ऊर्जा साठवून डोळ्याची पापणी लवण्याच्या आत प्रहार करतो!
shrimp
Sakal
जेव्हा हा जीव पंच मारतो, तेव्हा त्याचा वेग पाण्याखाली ताशी ८० किमी (२३ मीटर प्रति सेकंद) इतका असतो. हा वेग बंदुकीतून सुटणाऱ्या '.२२ कॅलिबर' गोळीच्या प्रवेगाइतका (१०,४०० G) प्रचंड असतो!
shrimp
Sakal
स्वतःच्या वजनाच्या तब्बल २,५०० पट अधिक म्हणजेच १,५०० न्यूटन इतक्या प्रचंड दाबाने हा प्रहार होतो, ज्यामुळे अॅक्वेरियमची जाड टेम्पर्ड काचही फुटते. म्हणूनच याला 'थंब स्प्लिटर' म्हटले जाते!
shrimp
Sakal
काच किंवा कवच फुटण्यामागचे मुख्य रहस्य म्हणजे 'कॅव्हिटेशन'! याच्या वेगामुळे पाण्यात निर्वात बुडबुडे तयार होऊन ते फुटतात आणि त्यातून दुसरी भयानक 'शॉकवेव्ह' निर्माण होते, जी काचेला तडा देते.
shrimp
Sakal
हे बुडबुडे फुटताना एका सेकंदाच्या सूक्ष्म भागासाठी पाण्यात प्रकाशाची ठिणगी पडते आणि सूर्याच्या पृष्ठभागाइतकी प्रचंड उष्णता तयार होते, ज्यापुढे कठीण कवचाचे खेकडे आणि शंख टिकूच शकत नाहीत!
shrimp
Sakal
काच फोडताना याच्या स्वतःच्या मुठीला काहीच होत नाही; कारण त्यावर 'हायड्रॉक्सीअॅपेटाइट' खनिजाचे सर्पिलाकार थर (Bouligand Structure) असतात, जे धक्का शोषून घेतात आणि हात तुटू देत नाहीत.
shrimp
Sakal
या ६ इंचाच्या जीवाची न तुटणारी मूठ आणि १६ प्रकारचे रंग पाहणारे हाय-टेक डोळे यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ लष्करासाठी नवीन 'बुलेटप्रूफ कवच' व कॅन्सर शोधणारे कॅमेरे बनवत आहेत!
shrimp
Sakal
Frogs
Sakal