पृथ्वीवरून बेडूक संपले तर काय होईल? वाचा खास माहिती!

विनयन वाघमारे

पृथ्वीवरून बेडूक संपले तर ...

पावसाळ्यात डराव-डराव करणारा बेडूक आपल्याला सामान्य वाटतो; पण पृथ्वीवरून बेडूक नष्ट झाले तर मानवी अस्तित्वच धोक्यात येऊ शकते!

frogs

|

Sakal

एका हंगामात खातो १०,००० कीटक!

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण एकटा बेडूक एका ऋतूमध्ये तब्बल १०,००० हून अधिक हानिकारक कीटक फस्त करतो आणि निसर्गाचे संतुलन राखतो.

frogs

|

Sakal

डेंग्यू आणि मलेरियापासून तुमचे रक्षण!

बेडूक नसतील तर डासांची संख्या अक्राळविक्राळ वाढेल. मलेरिया आणि डेंग्यू पसरवणारे डास व त्यांच्या अळ्या खाऊन बेडूक आपले प्राणघातक आजारांपासून रक्षण करतात.

frogs

|

Sakal

शेतकऱ्यांचा खरा आणि मोफत मित्र!

शेतातील पिकांवर पडणारी कीड आणि टोळधाड बेडूक नैसर्गिकरीत्या संपवतात. बेडकांची संख्या घटल्यास पिकांवरील रोगराई वाढून अन्नधान्याचे उत्पादन घटते.

frogs

|

Sakal

निसर्गाचा 'सायलेंट अलार्म' (Bio-indicator)

बेडूक आपल्या संवेदनशील त्वचेतून पाणी आणि हवा श्वसन करतो. त्यामुळे पाणी किंवा हवा विषारी झाल्यास सर्वात आधी बेडूक गायब होतात आणि आपल्याला प्रदूषणाचा इशारा देतात.

frogs

|

Sakal

पाण्याचे नैसर्गिक फिल्टर!

बेडकाची पिल्ले (Tadpoles) तलावातील आणि नदीतील अतिरिक्त शेवाळ खाऊन टाकतात, ज्यामुळे गोड्या पाण्याचे साठे स्वच्छ व जिवंत राहण्यास मदत होते.

frogs

|

Sakal

अन्नसाखळी आणि वैद्यकीय वरदान!

साप, पक्षी आणि माशांसाठी बेडूक हा मुख्य आहार आहे. इतकेच नव्हे तर बेडकाच्या त्वचेतील घटकांपासून कॅन्सर व गंभीर संसर्गावरील औषधांवर संशोधन सुरू आहे.

frogs

|

Sakal

४०% प्रजाती धोक्यात; त्यांना वाचवणे गरजेचे!

रासायनिक कीटकनाशके आणि सिमेंटीकरणामुळे जगातील ४० टक्क्यांहून अधिक बेडकांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग आणि स्वतःला वाचवायचे असेल, तर बेडूक जगलाच पाहिजे!

frogs

|

Sakal

दोन्ही समुद्रांत वादळ! पुढचे ७ दिवस धोक्याचे?

Weather

|

Sakal

क्लिक करा...