मटण खाल्यानंतर या ६ चुका टाळा

Monika Shinde

मटण

मटण खाल्यानंतर आपल्याला काही खास गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या कोणत्या ६ चुका मटण खाल्यानंतर टाळाव्यात

तत्काळ पाणी पिणे

मटण खाल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळा. यामुळे पचनास अडथळा येऊ शकतो. यामुळे पाणी थोडं वेळाने प्यायला हवं.

चहा किंवा कॉफी पिणे

मटण खाल्यानंतर चहा किंवा कॉफी पिणे टाळा. यामुळे पचनास अडथळा येऊ शकतो आणि ऍसिडिटीची समस्या वाढू शकते.

तिखट पदार्थ खाणे

मटण खाल्यानंतर अधिक तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा, कारण यामुळे पचनास त्रास होऊ शकतो.

शारीरिक कष्ट करणे

मटण खाल्यानंतर लगेच व्यायाम करणे किंवा कष्टाचे काम करणं पचनासाठी हानिकारक असू शकते. यामुळे मळमळ किंवा अपचन होऊ शकते.

दुधाच्या पदार्थांपासून दूर राहा

मटण आणि दुध एकत्र सेवन केल्यास अपचन किंवा गॅसची समस्या होऊ शकते. त्यामुळे मटण खाल्यानंतर दुधाचे पदार्थ टाळा.

झोपणे

मटण खाल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नका. थोडा वेळ शांत बसा, यामुळे पचन प्रक्रियेला मदत मिळेल.

ताजे फळ खाणे

मटण खाल्यानंतर ताजे फळ खाणे टाळा, कारण ते मटणाशी योग्य पचनासाठी जुळत नाही. यामुळे गॅस किंवा मळमळ होऊ शकते.

बाळाच्या पोटातील गॅस काढण्यासाठी काय करावे?

येथे क्लिक करा