Monika Shinde
बाळाच्या पोटात गॅस होणे हे सामान्य आहे. बाळाच्या पोटातील गॅस काढण्यासाठी काही सोप्या उपायांची मदत घेतल्यास, बाळाला आराम मिळू शकतो. चला तर मग, जाणून घेऊया
बाळाला पाठीवर न झोपवत उलटं पोटावर ठेवून हलकासा मसाज करा. यामुळे गॅस बाहेर पाण्यास मदत होऊ शकते.
बाळाच्या पायांना सायकलिंग सारखा हळुवारपणे हलवा. हे पोटातील गॅस कमी करण्यासाठी उपयुक्त असते.
बाळाच्या पोटावर हळुवारपणे गोलाकारात मसाज करा. यामुळे गॅसचे प्रमाण कमी होऊ शकते.
दूध पिताना बाळाला तिरके धरल्यास गॅसची समस्या कमी होऊ शकते.
प्रत्येक आहारानंतर बाळाचा ढेकर काढायला विसरू नका. यामुळे गॅस पोटात जमा होत नाही
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बाळाला थोडंसं जिरे पाणी देऊ शकता, ज्यामुळे गॅस कमी होऊ शकतो.
बाळाची दूध पिण्याची स्थिती योग्य नसल्यास गॅसची समस्या होऊ शकते, त्यामुळे स्थिती योग्य ठेवावी.