kimaya narayan
बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक, निर्माते राज कपूर यांचं नाव आजही भारतीय सिनेविश्वात आदराने घेतलं घेतलं. जाणून घेऊया त्यांच्याविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टी.
राज कपूर यांना एक फिल्म बनवायची आहे. ज्याचं नाव आहे 'मेकअप उतारो'. एक अभिनेता ज्याला कधीच वयस्कर व्हायचं नसतं याची ही गोष्ट आहे. त्याची बायको आणि त्याची प्रेयसीही म्हाताऱ्या होऊ नये अशी त्याची इच्छा असते. पण कधीच हा सिनेमा बनला नाही.
त्यांच्या सिनेमांमध्ये कायमच त्यांची प्रेयसी असलेल्या नर्गिस यांच्याबरोबर वैयक्तिक आयुष्यातही त्यांचं रिलेशनशिप होतं. पण ते त्यांच्या पत्नीला सोडायला तयार नव्हते त्यामुळे नर्गिस यांनी हा हट्ट सोडून त्यांच्याशी ब्रेकअप केला.
1950-56 दरम्यान राज कपूर हे दिलीप कुमार यांच्या बरोबरीनेच सगळ्यात जास्त मानधन घेणारे कलाकार होते. तर 1957-63 मध्ये देव आनंदच्या मागोमाग जास्त मानधन घेणारे अभिनेते होते.
राज कपूर यांनी बारी दादी या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
राज कपूर यांच्यावर चार्ली चॅप्लिनचा विशेष प्रभाव होता.त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सिनेमात त्याची काहीशी छटा भूमिकेत दिसायची.
राज कपूर यांनी कधीच निगेटिव्ह भूमिका साकारली नाही. देव आनंद नंतरचे ते दुसरे कलाकार होते ज्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारली नाही.