kimaya narayan
दीपिका पदुकोण ते रिचा चड्ढा. 2024 या वर्षात अनेक अभिनेत्रींनी मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. पाहूया यापैकी गाजलेले फोटोशूट्स.
अभिनेत्री रिचा चड्ढाने यावर्षी तिची प्रेग्नेंसी जाहीर केली. तिने काही महिन्यांपूर्वीच मुलीला जन्म दिला.
तिचं मॅटर्निटी फोटोशूट खूप गाजलं. पोटावर आणि छातीवर काढलेल्या टॅटूमुळे ती चर्चेत राहिली होती.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहने यावर्षी त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी जाहीर केली. त्यावेळी दीपिकाने केलेलं फोटोशूट गाजलं.
सुरुवातीला दीपिकाची प्रेग्नेंसी फेक असल्याच्या चर्चा होत्या. पण या फोटोशूटमुळे या चर्चा शमल्या. तिने लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे.
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने इजिप्तशियन स्टाईल फोटोशूट केलं होतं.
काही महिन्यांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला.
अभिनेत्री सोनाली सेहगलचंही मॅटर्निटी फोटोशूट गाजलं. तिने तिच्या पेट डॉगबरोबर हे फोटोशूट केलं होतं.
सोनालीने काही महिन्यांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला.