Smart Cooking Hacks: स्वयंपाक करताना 'या' 6 गोष्टी ठेवा लक्षात

Anushka Tapshalkar

झटपट स्वयंपाक

स्वयंपाक हा आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग आहे. पण तो तितकाच वेळखाऊही असतो. जर काही सोप्या टिप्स वापरल्या तर स्वयंपाक झटपट आणि सोपा करता येऊ शकतो.

Fast and Easy Cooking

|

sakal

तयारी आधीच करा

नवीन पदार्थ बनवण्यापूर्वी रेसिपी नीट वाचा आणि सर्व साहित्य आधीच तयार ठेवा. त्यामुळे स्वयंपाकात घाई होत नाही.

Prepare for the Recipe

|

sakal

घटकांचे व्यवस्थापन

दैनिक वापरातील मसाले आणि वस्तू एका बॉक्समध्ये किंवा ठराविक ठिकाणी ठेवा. शोधण्याचा वेळ वाचतो.

Ingredient Management

|

sakal

हवाबंद डबे वापरा

सुकामेवा, स्नॅक्स किंवा इतर वस्तू हवाबंद डब्यांमध्ये ठेवा आणि लेबल लावा. वस्तू जास्त काळ ताज्या राहतात.

Use Air-Tight Containers

|

sakal

कांदा चिरताना

कांदा चिरण्यापूर्वी चॉपिंग बोर्डवर थोडे मीठ घाला किंवा कांदा पाण्यात भिजवा. डोळ्यांत पाणी येत नाही.

Onion Cutting Tips

|

sakal

आदल्या दिवशी तयारी करा

भाज्या रात्रीच चिरून हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवा. सकाळचा किंवा कामाच्या वेळेचा मोठा वेळ वाचतो.

Prepare Beforhand

|

sakal

लसूण सोलण्याची झटपट ट्रिक

लसूण ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा किंवा दोन स्टीलच्या भांड्यांमध्ये हलवा. साली पटकन निघतात.

Garlic Peeling Hack

|

sakal

स्वयंपाकात वेग आणि शिस्त ठेवा

स्वयंपाकाचा ताण कमी करण्यासाठी ठराविक क्रम, स्वच्छता आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे, ज्यामुळे काम जलद होते.

Speed and Disciplined Cooking

|

sakal

फक्त 'या' 5 सोप्या ट्रिक्स वापरा अन् आठवडाभर कोथिंबीर ताजी ठेवा!

How to Keep Codiander Leaves Fresh for a Long Time | sakal
आणखी वाचा