Anushka Tapshalkar
कोथिंबीर विकत घेतल्यानंतर लवकर कोमेजते? मग घरच्या घरी कोथिंबीर दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी या युक्त्या नक्की वापरून पाहा.
कोथिंबीर धुऊन, कोरडी करून किचन पेपरमध्ये गुंडाळून किंवा तशीच एअरटाइट डब्यात ठेवा.
हिरव्या कोथिंबीरीला स्वच्छ करून ओलसर सूती कपड्यात गुंडाळा आणि प्लास्टिक पिशवीत ठेवून फ्रीज करा.
ग्लास जारमध्ये थोडे पाणी घेऊन कोथिंबीरीचे देठ त्या पाण्यात बुडवा, नंतर वरून प्लास्टिक रॅप लावा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
कोथिंबीर बारीक चिरा, ती पाण्यासोबत बर्फाच्या ट्रेमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.
कोथिंबीर पूर्णपणे सुकवून घ्या, नंतर झिपलॉक बॅगमध्ये हवामुक्त करून ठेवा.
लवकर वापरणार नसल्यास, कोथिंबीर न धुता फक्त स्वच्छ कपड्याने पुसून साठवा. यामुळे ती जास्त काळ टिकते.
साठवताना कोथिंबीर धुतल्यास ती लवकर ओलसर होऊन सडते, त्यामुळे वापरण्यापूर्वीच धुणे योग्य.