Anushka Tapshalkar
महिलांना घर, ऑफिस आणि कुटुंब सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजार होण्याचा धोका वाढतो.
महिलांनी आपल्या आहारात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. हे शरीर बळकट करतं आणि ऊर्जा प्रदान करतं.
ब्रेकफास्ट किंवा स्नॅकमध्ये ग्रीक योगर्ट खा. यात प्रोटीन, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात. पचन सुधारतं, हाडं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बदामांमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि मॅग्नेशियम असतं. हे स्नॅक म्हणून खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकते आणि मेंदू, हृदय व त्वचाही तंदुरुस्त राहते.
चिया, फ्लॅक्स आणि पंपकिन सीड्स हे ओमेगा-3, फायबर आणि प्रोटीनने भरलेले असतात. हे ब्रेकफास्टमध्ये घेतल्यास एकंदर आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
डाळी प्रोटीन व कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहेत. या नियमित आहारात असतील तर शरीराला ऊर्जा मिळते आणि पचन क्रिया सुधारते.
पालक, मेथी यांसारख्या भाज्या लोह आणि फॉलिक अॅसिड देतात. त्या खाल्ल्याने अॅनिमियापासून संरक्षण मिळतं आणि शरीर सशक्त राहतं.
सीझननुसार मिळणारी फळं व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असतात. रोज फळांचा आहारात समावेश करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.