Anushka Tapshalkar
डायबिटीज हा असा आजार आहे ज्यात तुम्हाला गोडाचे आणि साखरेचे मोजून मापून सेवन करावे लागते. अशात कोणते स्नॅक्स खावे हा मोठा प्रश्न पडतो.
पण पुढे दिलेले पदार्थ चविष्टही आहेत आणि शरीरासाठी चांगलेही.
उकडलेली अंडी प्रोटीनने भरपूर असतात. शरीरात प्रोटीनची योग्य मात्रा असल्यास रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
बेरीजमध्ये फायबर असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. दह्यात प्रोबायोटिक्स असतात, जे पचनासाठी चांगले असतात. त्यामुळे डायबेटिक पेशंट्ससाठी हा एक उत्तम स्नॅक पर्याय आहे.
डायबेटिक पेशंट्सना संध्याकाळच्या वेळी हलकेफुलके आणि चविष्ट खायचे असेल, तर भाजलेल्या चण्यांचा चवदार चाट खाऊ शकतात. भाजलेले चणे खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि पोटही भरते.
या बियांमुळे लगेच पोट भरल्यासारखे वाटते. यामध्ये शरीरासाठी फायदेशीर असे अनेक घटक असतात आणि या बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतात.
थोडेसे बदाम खाल्ल्यास पोट भरते आणि ते कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतात. बदामांमध्ये मॅग्नेशियमही असते, जे शरीराची क्रिया नीट ठेवायला मदत करते.
सफरचंदामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ते आणि थोडेसे पीनट बटर खाल्ल्यास चांगले कार्बोहैड्रेट्स मिळतात. योग्य प्रमाणात खाल्ल्यास हा एक उत्तम स्नॅक पर्याय आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.