Anushka Tapshalkar
शरीरात साचलेले 'आम' म्हणजेच विषारी द्रव्ये थकवा, त्वचेसंबंधी त्रास आणि पचनाच्या समस्या निर्माण करतात.
'पंचकर्म' म्हणजे शरीरशुद्धीसाठीचे पाच उपचार. हे केवळ डिटॉक्स नव्हे, तर नवचैतन्य देणारी प्रक्रिया आहे.
औषधींच्या मदतीने उलटी करून फुफ्फुसांतील व पचनातील अतिरिक्त कफ काढून टाकला जातो.
औषधी देऊन जुलाबाद्वारे यकृत, आतडे आणि पित्तशुद्धी केली जाते.
तेल किंवा औषधी काढ्यांच्या एनीमा उपचारांद्वारे कोलन डिटॉक्स म्हणजेच मोठ्या आतड्याचं शुद्धीकरण आणि वातशमन केले जाते.
नाकात औषधी तेल टाकून मेंदू, सायनस, त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारलं जातं.
शरीरावर जळू (Leech) ठेवून रक्तातून दूषित घटक काढून त्वचेचे आजार आणि सूज कमी केली जाते.
नियमित पंचकर्माने डोक्यातील गुंतागुंत दूर होते, झोप सुधारते आणि मेंदूला 'रीसेट' मिळतो.
तज्ज्ञ सांगतात की हिवाळा-पावसाळ्यासारख्या ऋतूंमध्ये पंचकर्म केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य टिकवता येते.