Anushka Tapshalkar
NHS च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार “फ्री शुगर” (अन्नात/पेयात घातलेली साखर, मध, सिरप, ज्यूसमधील साखर) ही रोजच्या कॅलरींच्या 5% पेक्षा जास्त नसावी. प्रौढांसाठी जास्तीत जास्त 30 ग्रॅम, 7–10 वर्षांच्या मुलांसाठी 24 ग्रॅम आणि 4–6 वर्षांच्या मुलांसाठी 19 ग्रॅम.
sugar
सॉफ्ट ड्रिंक आणि साखरयुक्त पदार्थ जास्त घेतल्यास त्वचेवर पिंपल्स वाढू शकतात. संशोधनानुसार साखरयुक्त पेये घेणाऱ्यांमध्ये मध्यम ते गंभीर ॲक्नेचा धोका जास्त दिसतो.
Frequent Pimples
sakal
जास्त साखर म्हणजे जास्त “रिकाम्या कॅलरीज”. यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि हृदयरोग, टाइप-2 डायबिटीजचा धोका वाढतो. साखरयुक्त पदार्थांमध्ये फायबर व प्रोटीन कमी असल्याने भूक लवकर लागते.
Sudden Weight Gain
संशोधनानुसार साखरयुक्त पेये आणि जास्त अॅडेड शुगर यांचा उच्च रक्तदाबाशी संबंध आढळतो. हायपरटेन्शनमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
Rise in Blood Pressure
sakal
जास्त साखर घेतल्याने शरीरात “AGEs” (Advanced Glycation End Products) तयार होतात. हे घटक त्वचेतील कोलेजन कमी करून सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि त्वचा कोरडी होण्यास कारणीभूत ठरतात.
Early Aging
sakal
साखर खाल्ल्यानंतर सुरुवातीला ऊर्जा मिळते, पण नंतर ब्लड शुगर अचानक कमी झाल्याने थकवा, चिडचिड आणि पुन्हा गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. हा एक दुष्टचक्र बनतो.
Constant Fatigue
sakal
जास्त साखर घेतल्यास झोप लागण्यास उशीर होतो, झोप खोल लागत नाही आणि रात्री वारंवार जाग येते. परिणामी दुसऱ्या दिवशी अधिक थकवा जाणवतो.