केसांच्या वाढीसाठी रोजमेरी तेलाचे 7 आश्चर्यकारक फायदे

Anushka Tapshalkar

केसांच्या वाढीस चालना

रोजमेरी तेल टाळूतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस जलद गतीने वाढतात आणि अधिक जाडसर होतात.

Rosemary Oil | sakal

केस गळणे कमी करते

हे तेल डीएचटी हार्मोन अवरोधित करते, ज्यामुळे केस गळतीचे प्रमाण कमी होते.

Rosemary Oil | sakal

वेळेपूर्वी पांढरे होणे थांबवते

अँटीऑक्सिडंट्सने युक्त रोजमेरी तेल केस पांढरे होण्याची प्रक्रिया धीमी करून त्यांना नैसर्गिक रंग देण्यास मदत करते.

Rosemary Oil | sakal

डैंड्रफशी लढा देते

अँटीफंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे रोजमेरी तेल डैंड्रफ कमी करते आणि टाळूतील खाज आणि कोरडेपणा दूर करते.

Rosemary Oil | sakal

केसांना बळकटी देते

नियमित वापर केल्याने हे तेल केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस तुटण्याची समस्या कमी करते.

Rosemary Oil | sakal

टाळूचं आरोग्य सुधारते

टाळूतील अशुद्धता साफ करून रोजमेरी तेल केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण पुरवते.

Rosemary Oil | sakal

नैसर्गिक उपाय

रसायनयुक्त उत्पादनांऐवजी रोजमेरी तेल एक सुरक्षित, नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय आहे.

Rosemary | sakal

रोजमेरी तेल कसं वापरायचं?

रोजमेरी तेल वापरण्यासाठी ते तुमच्या आवडीच्या तेलासोबत टाळूवर मालिश करा किंवा तुमच्या शँपूमध्ये मिसळा. अधिक फायदे मिळवण्यासाठी, रात्री टाळूवर लावून ठेवा आणि सकाळी धुवा.

Rosemary Oil | sakal

डाळिंब खाताना ‘या’ 5 चुका टाळा, नाहीतर होऊ शकतो त्रास

Pomegranate | sakal
आणखी वाचा