तंदुरुस्ती, त्वचा आणि मनाचा फ्रेशनेससाठी केसराचे ७ भन्नाट फायदे

Anushka Tapshalkar

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

केसरात क्रोसिन, क्रोसेटिन आणि सॅफ्रानल सारखी सक्रिय संयुगे असतात जी अँटिऑक्सिडंट्स व प्रतिजैविक गुणधर्माने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. हळद, लवंग, दालचिनीसारख्या मसाल्यांसोबत घेतल्यास याचा परिणाम अधिक वाढतो.

Boosts Immunity

| Sakal

मूड सुधारते

संशोधनानुसार केसर नैसर्गिक antidepressant प्रमाणे काम करतं. डिप्रेशन, चिंता आणि झोपेच्या समस्या सुधारण्यास मदत होते. मात्र, गंभीर मानसिक समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Mood Swings

|

sakal

हृदयाचे आरोग्य टिकवते

सॅफ्रॉनमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात. हे क्रॉनिक इन्फ्लेमेशन कमी करून हृदयविकाराची शक्यता कमी करते.

Supports Heart Health

|

Sakal

त्वचेची चमक वाढवते

केसर त्वचेवर अँटिऑक्सिडंट, अँटी-एजिंग, अँटी-डार्क स्पॉट गुणधर्माने कार्य करतो. आयुर्वेदातील कुमकुमादी तेलमध्ये वापरून त्वचेचा नैसर्गिक रंग उजळवता येतो.

Glows Skin

|

sakal

पचन सुधारते

सॅफ्रॉनमध्ये असलेले संयुगे पचन प्रणालीसाठी फायदेशीर आहेत. ब्लोटिंग कमी करतात, पचन सुधारतात आणि इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजसारख्या समस्या नियंत्रित करतात

Improves Digestion

|

sakal

टॉक्सिन्स काढण्यास मदत

केसरात असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यात मदत करतात व दीर्घकालीन इन्फ्लेमेशन टाळतात.

Body Detox | sakal

वापर व साठवणुकीस सूचना

केसर दुधात, बिर्याणी, मिठाई किंवा हर्बल टीमध्ये मिसळा. जास्त प्रमाणात सेवन टाळा, वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ८°C किंवा त्यापेक्षा कमी तापमानात अंधाऱ्या ठिकाणी ठेवा. ५% आर्द्रतेसह साठवणे चांगले.

Saffron

|

ESakal

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसूण की आलं फायदेशीर?

Garlic VS Ginger - Best for Winter Immunity

|

sakal

आणखी वाचा