Anushka Tapshalkar
थंडी वाढली की सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणं महत्त्वाचं ठरतं.
Winter and Immunity
sakal
लसूण चिरल्यावर किंवा ठेचल्यावर तयार होणारा अॅलिसिन हा घटक इम्युन सेल्स अधिक सक्रिय करतो. त्यामुळे शरीराला व्हायरसविरुद्ध जलद प्रतिसाद देण्यास मदत होते.
Garlic
sakal
संशोधनानुसार नियमित लसूण सेवन केल्यास सर्दी-फ्लूची तीव्रता कमी होऊ शकते. मात्र तो संतुलित आहाराचा भाग असणं गरजेचं आहे.
sakal
जिंजरॉल आणि शोगॉल हे घटक सूज कमी करण्यास मदत करतात आणि पेशींना होणारे नुकसान टाळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते.
Ginger
sakal
आलं पचन सुधारतं, पोट निरोगी ठेवतं. पचनसंस्था नीट काम करत असेल तर रोगप्रतिकारक शक्तीही अधिक प्रभावी राहते.
Supports Digestive System
sakal
घसा खवखवणे, मळमळ, सायनस यासाठी आलं उपयुक्त मानलं जातं. ते थेट जंतूंवर हल्ला न करता शरीराच्या आतल्या यंत्रणेला बळकटी देतं.
Ginger Benefits in Winter
sakal
लसूण आणि आलं दोन्ही फायदेशीर असले तरी एकटं सुपरफूड पुरेसं नाही. संतुलित आहार, पुरेशी झोप, तणाव नियंत्रण आणि नियमित जेवण यामुळेच हिवाळ्यात इम्युनिटी मजबूत राहते.
Lifestyle is Important
sakal
Simple Habits for Sustainable Weight Loss in New Year
sakal