Anushka Tapshalkar
चंदन तेलाचा वापर सौंदर्य, मानसिक आरोग्य व शरीराच्या विविध तक्रारींसाठी केला जातो. त्याचा गंध आणि गुणधर्म दोन्ही आरोग्यदायी आहेत.
आयुर्वेदात चंदनाचा वापर हजारो वर्षांपासून होत आहे. त्याच्या थंडावा देणाऱ्या, जंतुनाशक व मनशांती देणाऱ्या गुणांमुळे हे तेल खास मानले जाते.
चंदनाचा लेप त्वचेवरील उष्णतेमुळे होणारी जळजळ, सूज व लालसरपणा कमी करतो. त्वचेला उजळ आणि तजेलदार बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.
चंदन तेलाचा सुगंध तणाव आणि चिंता कमी करतो. अरोमाथेरपीमध्ये याचा वापर झोप सुधारण्यासाठी व मूड बूस्ट करण्यासाठी केला जातो.
चंदनात असलेल्या अल्फा-सँटालॉल या घटकामुळे सूज कमी होते. सोरायसिस, अॅटॉपिक डर्मेटायटिस यांसारख्या त्वचेच्या आजारांवर उपयोगी आहे.
संशोधनानुसार चंदनातील काही घटक कॅन्सरच्या पेशी वाढण्यास अडथळा करतात. त्वचा, स्तन, प्रोस्टेट व तोंडाच्या कॅन्सरवर चांगले परिणाम दिसून आले आहेत.
चंदनात जंतुनाशक व अँटीफंगल गुणधर्म आहेत. त्वचेवरील संसर्ग, वॉर्ट्स व इतर विकारांवर उपयोगी ठरते.
चंदन तेलात रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म आहेत. काही अभ्यासांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते असेही दिसून आले आहे.
चंदन मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतं. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि न्यूरोट्रान्समीटरच्या समतोलासाठी उपयुक्त आहे.