त्वचेसाठी लिंबाचे ७ फायदे माहीत आहेत का? वापरण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Anushka Tapshalkar

त्वचेला अँटीऑक्सिडंट संरक्षण

लिंबातील व्हिटॅमिन C त्वचेचे फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते. मात्र, कच्चा लिंबाचा रस चेहऱ्यावर लावू नये.

Lemon for Skin

|

sakal 

त्वचा दिसू शकते अधिक उजळ

व्हिटॅमिन C स्किनकेअरमुळे त्वचा उजळ आणि फ्रेश दिसू शकते. मात्र, कच्च्या लिंबाच्या रसामुळे जळजळ व लालसरपणा होऊ शकतो.

Lemon for Skin

|

sakal 

असमान त्वचेचा टोन सुधारण्यास मदत

व्हिटॅमिन C डार्क स्पॉट्स आणि पिग्मेंटेशन कमी दिसण्यास मदत करते. मात्र, कच्चा लिंबाचा रस थेट त्वचेवर लावणे टाळावे.

Lemon for Skin

|

sakal 

कोलेजन निर्मितीसाठी उपयुक्त

त्वचेची लवचिकता आणि मजबुती टिकवण्यासाठी कोलेजन महत्त्वाचे आहे. शरीरात कोलेजन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन C आवश्यक असते. त्यामुळे आहारातून लिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

Lemon for Skin

| sakal

सूर्यप्रकाशापासून संरक्षण? हे लक्षात ठेवा!

व्हिटॅमिन C स्किनकेअर त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करू शकते; पण लिंबाचा रस सनस्क्रीन नाही. सूर्यप्रकाशात तो त्वचेवर प्रतिक्रिया निर्माण करू शकतो.

Lemon for Skin

|

sakal 

लिंबू खा, पण चेहऱ्यावर लावू नका!

लिंबातील व्हिटॅमिन C आहारातून घेणे अधिक सुरक्षित. लिंबू पाणी, सॅलड किंवा जेवणात लिंबाचा वापर करा; मात्र ते थेट त्वचेवर लावू नका.

Lemon for Skin

| sakal

नैसर्गिक म्हणजे नेहमीच सुरक्षित नाही!

लिंबाचा रस त्वचेवर जळजळ किंवा रॅश निर्माण करू शकतो. त्यामुळे कच्च्या लिंबाऐवजी फॉर्म्युलेटेड व्हिटॅमिन C प्रोडक्ट वापरा आणि दिवसा सनस्क्रीन लावा.

Lemon for Skin

| sakal

कच्चं बीट खावं की ज्यूस प्यावा? आरोग्यासाठी कोणता पर्याय आहे फायदेशीर?

Beetroot

|

Sakal

आणखी वाचा