कच्चं बीट खावं की ज्यूस प्यावा? आरोग्यासाठी कोणता पर्याय आहे फायदेशीर?

Anushka Tapshalkar

सकाळी रिकाम्या पोटी खा बीट

सकाळच्या आहारात बीटचा समावेश केल्याने शरीराला फायबर, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. मात्र, रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोषकद्रव्ये अधिक शोषली जातात, याचा ठोस पुरावा नाही.

Beetroot

|

Sakal

ज्यूसपेक्षा सॅलडला द्या पसंती

बीटचा ज्यूस पिण्याऐवजी त्याचे सॅलड खा. यामुळे शरीराला फायबर मिळते आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते.

Beetroot

|

Sakal

गाजर आणि आवळ्यासोबत खा

बीट, गाजर आणि आवळा एकत्र खाल्ल्याने शरीराला विविध जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. आवळ्यातील व्हिटॅमिन सी लोहाच्या शोषणास मदत करते.

Beetroot

|

sakal

किती प्रमाणात खावे बीट?

दररोज एक मध्यम आकाराचे बीट किंवा आहारात मर्यादित प्रमाणात बीटचा समावेश करू शकता. अतिप्रमाणात खाल्ल्यास काहींना पोटाचे त्रास होऊ शकतात.

Beetroot

|

sakal

किडनी स्टोनचा त्रास असल्यास घ्या काळजी

बीटमध्ये ऑक्सलेट्स असतात. त्यामुळे कॅल्शियम ऑक्सलेटचे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच बीट खावे.

Beetroot

|

Sakal

रक्ताभिसरण सुधारण्यास होते मदत

बीटमधील नायट्रेट्स शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार होण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होऊन रक्तप्रवाह सुधारण्यास हातभार लागू शकतो.

Beetroot

|

Sakal

बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बीटमधील फायबर पचनासाठी उपयुक्त ठरते. तसेच फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य आणि शरीराच्या विविध कार्यांना पोषण मिळते.

Beetroot

|

Sakal

दिवाळीनंतर चेहरा दिसतोय निस्तेज? नैसर्गिक ग्लोसाठी घरीच बनवा ५ सोपे फेस टोनर!

Homemade Toners for Glowing and Radiant Skin

|

sakal

आणखी वाचा