Aarti Badade
स्मरणशक्तीसाठी आणि तंदुरुस्त शरीरासाठी दिवसाची दिनचर्या एकसारखी असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी रहाते.
दिवसाची सुरुवात 10-15 मिनिटांच्या मानसिक शांती आणि खोल श्वास घेतल्याने मन शांत होते आणि मेंदूचे कार्य सुरळीत होते.
बेरी, कमी फॅट्स असलेले प्रथिनं आणि हेल्दी पदार्थ खा. अँटी-इन्फ्लेमेटरी आहार करा. ज्यामुळे तुमच्या मेंदूला आणि शरीराला उत्तम ऊर्जा मिळते.
कार्डिओ, आणि योग यांचा समावेश करा. तुमचं शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक शांतता मिळेल.
नवीन गोष्टी करण्यास तुमच्या मेंदूला प्रोसाहीत करा. नियमित थोडावेळ वाचन करा.
झोपेच्या आधी स्क्रीन वेळ कमी करा आणि 7-9 तासांची चांगली झोप घ्या. झोप ही निरोगी शरीर आणि मेंदूसाठी खूप महत्त्वाची आहे.
दिवसभरात कुठे चुकतंय कुठे नाही कसे वागलात काय नवीन शिकलात या सर्व गोष्टी केल्याने मन हलके आणि मेंदूला चालना मिळते.
तुमचे शरीर नियमितपणे अॅक्टिव राहील अशा गोष्टी करा. ऑफिस किंवा घरी किंवा लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा. जेवणानंतर चाला, शरीर स्ट्रेच करत राहा, लहान हालचाली तुमच्या मेंदू आणि शरीराला ऊर्जा देतात.
या सवयी रोजच्या आयुष्यात रुजू करा आणि तुमच्या शरीराला आणि स्मरणशक्तीला तीव्र बनवा