फक्त 7 दिवस साखर सोडा! शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल

Aarti Badade

साखर

साखर केवळ चवीला गोड असते, पण तिचे अतिसेवन शरीरासाठी विष ठरू शकते. जर तुम्ही फक्त १ आठवडा साखर खाणे बंद केले, तर तुमच्या शरीरात काय बदल होतात ते जाणून घ्या.

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

चेहऱ्यावर चमक आणि 'जॉ लाईन'

जास्त साखर खाल्ल्याने चेहऱ्यावर सूज (Inflammation) येते. साखर सोडल्यास ही सूज कमी होते, चेहऱ्याचा फुगीरपणा जातो आणि तुमची जॉ लाईन स्पष्ट दिसू लागते.

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

ऊर्जा (Energy)

साखर खाल्ल्याने ब्लड शुगर वेगाने वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने कमी होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. साखर सोडल्यास शुगर लेवल स्टेबल राहते आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता.

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

पिंपल्स आणि डाग

साखर आणि स्किन इन्फ्लॅमेशन यांचा जवळचा संबंध आहे. साखर बंद केल्यावर डार्क स्पॉट्स कमी होतात आणि त्वचा अधिक ग्लोईंग व डागविरहीत दिसू लागते.

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

वजन कमी

चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि मिठाईच्या स्वरूपात जाणारी साखर 'एम्टी कॅलरीज' देते. १ आठवडा ही साखर टाळल्यास पोटाचा घेर आणि एकूण वजन कमी होण्यास सुरुवात होते.

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

पचन

साखरेमुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास होतो. साखरेचे प्रमाण कमी केल्यास पचनक्रिया सुधारते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) अनेक पटींनी वाढते.

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

साखरेला आरोग्यदायी पर्याय

जर तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा (Cravings) झाली, तर साखरेऐवजी खजूर, मनुके, ताजी फळे किंवा थोडा गूळ खा. फळांमधील नैसर्गिक साखर शरीरासाठी फायदेशीर असते.

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

भविष्यातील आजारांपासून बचाव

लहानपणापासूनच साखर मर्यादित ठेवल्यास भविष्यात होणारा मधुमेह (Diabetes) आणि लठ्ठपणाचा धोका टळतो. आजच स्वतःला ७ दिवसांचे हे चॅलेंज द्या!

Benefits of Quitting Sugar

|

Sakal

फिटनेससाठी जिम की योग? तज्ज्ञांच्या मतातून मिळेल योग्य उत्तर

Gym vs Yoga

|

Sakal

येथे क्लिक करा