Aarti Badade
फिट राहण्यासाठी सध्या दोन लोकप्रिय मार्ग आहेत - जिम आणि योग. पण यापैकी तुमच्या शरीराच्या गरजेनुसार नेमका कोणता पर्याय योग्य आहे?
Gym vs Yoga
Sakal
जर तुमचे ध्येय वेगाने वजन कमी करणे, शरीर सुडौल बनवणे आणि ताकद वाढवणे असेल, तर जिम हा अधिक प्रभावी पर्याय मानला जातो.
Gym vs Yoga
Sakal
शरीरात लवचिकता (Flexibility) आणण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी योग सर्वोत्तम आहे. योग केवळ शरीरच नाही तर मन देखील निरोगी ठेवतो.
Gym vs Yoga
Sakal
जिममधील वर्कआऊटमुळे कॅलरी वेगाने बर्न होतात, ज्यामुळे लठ्ठपणा लवकर कमी होतो. याउलट, योग हळूहळू मेटाबॉलिझम सुधारून शरीरात संतुलन राखतो.
Gym vs Yoga
Sakal
जिममुळे मसल्स आणि स्टॅमिना मजबूत होतो. मात्र, तणाव कमी करण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आणि अंतर्गत शांतीसाठी योग जास्त फायदेशीर ठरतो.
Gym vs Yoga
Sakal
ज्यांना कार्डिओ वर्कआऊट आणि हाय-ऍक्टिव्हिटी हवी आहे त्यांच्यासाठी जिम उत्तम आहे. योग केल्याने श्वसन क्षमता वाढते आणि फुफ्फुसे मजबूत होतात.
Gym vs Yoga
Sakal
जिमसाठी महागडी उपकरणे आणि ट्रेनरची गरज असते. याउलट, योग तुम्ही घरीही अत्यंत कमी खर्चात आणि सहजपणे करू शकता.
Gym vs Yoga
Sakal
आजारांपासून बचाव आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग निवडा, तर पिळदार शरीर आणि ताकद हवी असल्यास जिम हा उत्तम पर्याय आहे!
Gym vs Yoga
Sakal
Piles Causes
Sakal