Monika Shinde
अनेकांना अस्थमाचा त्रास होत असतो, पण बऱ्याच वेळा त्याची सुरुवातीची लक्षणं ओळखता येत नाहीत.
त्यामुळे लोक दुर्लक्ष करतात आणि अचानक अस्थमाचा अटॅक येण्याची शक्यता वाढते. चला तर मग, सुरुवातीची लक्षणं कोणती ते जाणून घेऊया.
श्वास घेताना धाप लागणे किंवा छातीत जडपणा जाणवणे हे सुरुवातीचं प्रमुख लक्षण आहे.
रात्रभर किंवा सकाळी उठल्यावर सतत खोकला येणे
वारंवार सर्दी होणे आणि घसा अडकलेला वाटणे, विशेषतः हवामान बदलल्यावर, ही लक्षण दिसून येतात.
श्वास घेताना श्वसननलिकांमधून शीं... शीं... असा आवाज येणे हे अस्थमाचं लक्षण असू शकतं.
थोडं चालल्यावर थकवा जाणवणे किंवा जिने चढणं देखील कठीण वाटणं.
या सर्व लक्षणांपैकी काही आढळल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.