Anushka Tapshalkar
केळीच्या देठातून निघणारा ‘इथिलीन गॅस’ पकडला जातो आणि पिकण्याचा वेग कमी होतो. प्रत्येक केळ वेगळं करून त्याच्या देठाला रॅप लावा.
काउंटरवर ठेवली तर ती लवकर पिकतात. हुकवर टांगल्याने हवा खेळती राहते आणि केळी ब्रूस पडत नाहीत.
सफरचंद, टोमॅटो, ॲव्होकॅडो हे सर्व इथिलीन गॅस सोडतात. त्यामुळे केळी पटकन पिकतात. म्हणून ती स्वतंत्र ठेवा.
फ्रिज फक्त पिकलेली केळी ताजी ठेवतो. कच्ची केळी थंडीत काळी पडतात आणि पिकण्याची प्रक्रिया थांबते.
एकत्र ठेवली की केळी एकमेकांना लवकर पिकवतात. वेगळी ठेवल्यास त्यांची ताजेपणा जास्त टिकतो.
जास्त उष्णतेमुळे केळी पटकन ब्राउन होतात. खोलीच्या तापमानात, सावलीत ठेवा.
स्लाइस केलेली केळी पटकन काळी पडतात. हलका लिंबू/लिंबाचा रस लावल्याने ती जास्त वेळ ताजी राहतात.