भारतीयांनी जगाला दिलेल्या 7 गोष्टी; ज्यांनी बदलले संपूर्ण जग!

Aarti Badade

भारताचा जगावर प्रभाव

भारताची ओळख केवळ संस्कृती आणि परंपरांसाठी नाही, तर ज्ञान, तंत्रज्ञान आणि जीवनशैलीतील योगदानासाठीही आहे. काही गोष्टींचा जगभर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

योगविद्या

योगाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी आज जगभर योग केला जातो. स्वामी विवेकानंदांनी पश्चिमेकडील देशांमध्ये योगाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

रेडिओ तंत्रज्ञान

भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओ तरंग आणि मायक्रोवेव्हच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रयोग केले. त्यांच्या संशोधनाने वायरलेस तंत्रज्ञानाच्या विकासाला मोठी चालना मिळाली.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

फायबर ऑप्टिक्स

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ नरिंदर सिंह कपानी यांना फायबर ऑप्टिक्सच्या विकासातील अग्रणी व्यक्ती मानले जाते. आज दूरसंचार, इंटरनेट आणि वैद्यकीय क्षेत्रात फायबर ऑप्टिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

साप-शिडीचा खेळ

साप-शिडी या पारंपरिक भारतीय खेळाचा उगम प्राचीन भारताशी जोडला जातो. या खेळातून चांगले-वाईट कर्म आणि नैतिक मूल्ये समजावून सांगण्याचा उद्देश असल्याचे मानले जाते.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

USB पोर्ट

भारतीय-अमेरिकन अभियंता अजय भट्ट यांनी USB तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. आज संगणक, मोबाइल आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जोडण्यासाठी USB हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

फ्लश टॉयलेट

पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार, सिंधू संस्कृतीत सांडपाणी व्यवस्थापन आणि जलनिस्सारणाची विकसित व्यवस्था होती. प्राचीन भारतीय शहरांमध्ये स्वच्छता आणि पाण्याच्या व्यवस्थापनाला महत्त्व दिले जात होते.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

शॅम्पू

केस स्वच्छ करण्यासाठी वनस्पती आणि नैसर्गिक घटकांचा वापर भारतात प्राचीन काळापासून केला जात असल्याचे उल्लेख आढळतात. पुढे याच परंपरेतून ‘शॅम्पू’ची संकल्पना विकसित होत गेली आणि ती जगभर पोहोचली.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

भारताचा अभिमान

योगापासून फायबर ऑप्टिक्सपर्यंत आणि प्राचीन स्वच्छता व्यवस्थेपासून आधुनिक USB तंत्रज्ञानापर्यंत, भारतीय ज्ञान आणि संशोधनाचा जगाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

Things India Gave the World That Changed History

|

Sakal

काळवंडलेले ओठ दिसतील गुलाबी; घरच्या घरी बनवा गुलाबाचा लिप बाम

Rose Lip Balm

|

Sakal

येथे क्लिक करा