पुजा बोनकिले
गुळाच्या चहाची चवच न्यारी.पावसाळ्यात हा चहा चविष्ट आणि पौष्टिक असतो. तसेच हा औषधी गुणधर्माचाही असतो.
हा चहा केरळमधील मालाबार भागात खुपच लोकप्रिय आहे. या चहासाठी पाण्यात दालचिनी,पुदिन्याची पानं,लवंगा, वेलची एक कपासाठी साखर अर्धा चमचा चहा पावडर घाला आणि चांगले उकळा. दूध खालू नका.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. हा चहा करताना दूध आणि चहा पावडरसोबत हळदही घालावी. तुम्ही साखरेएवजी गूळ घालावा. हा चहा पावसाळ्यात केवळ चवीसाठी नाही कर निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात अनेकांना सर्दी, खोकला यासारख्या समस्यांचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून तुळशीचा चहा उत्तम ठरतो. फक्त चहा करताना तुळशीच्या पानांचा अतिरेक करू नये.
पावसाळ्यात मसाला चहा म्हणजे मजवाणीच. मसाल्यांमुळे चहा मस्त कडक आणि चविष्ट होतो. बडिशोप, वेलची,लवंग, दालचिनी, आलं, मिरे हे सर्व चहा किती आहे ते प्रमाणात घेऊन कुटून चहात टाका.चहा चांगला उकळला की मग प्यावा.
पावसाळ्यात चहाची चव हे दोन पदार्थ वाढवतात. पावसाळ्यात चहा बनवताना लवंग आणि वेलची कुटून टाकावी. यामुळे चहाला चांगला सुगंध आणि चव येते.
पावसाळ्यात रोज एक प्रकारचा चहा करून सात दिवस वेगवेगळ्या चवीचा चहा पिण्याची ही एक चांगली संधी आहे.