राहुल शेळके
2024 मध्ये IPL ने जवळपास $16.4 अब्ज (₹1,35,000 कोटी) उत्पन्न मिळवलं. इतका मोठा महसूल ते कमावतात तरी कसा? चला जाणून घेऊया IPL चे बिझनेस मॉडेल.
IPL हे मनोरंजन + खेळ + मार्केटिंग या त्रिकुटावर आधारित आहे. हे एक फ्रँचायझी मॉडेल आहे जिथे 10 संघ एकमेकांशी स्पर्धा करतात आणि उत्पन्न कमवतात.
IPLचं सर्वात मोठं उत्पन्न ब्रॉडकास्टिंग हक्कांमधून येतं. TV आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मॅच दाखवण्यासाठी कंपन्या कोट्यवधी रुपये देतात.
प्रत्येक संघाला 7 घरच्या मॅचेस आयोजित करायच्या असतात. तिकीट विक्रीतून 10% पर्यंत उत्पन्न मिळतं. VIP बॉक्स, प्रीमियम सीट्स, सामान्य तिकिटं यातूनही पैसा येतो.
IPL संघ जर्सी, कॅप्स, अॅक्सेसरीज विकून मोठं उत्पन्न कमावतात. ऑनलाईन शॉपिंगमुळे ही विक्री आणखी वाढली आहे.
प्रत्येक संघाच्या जर्सीवर 8-10 ब्रँड्सचे लोगो असतात. पेय, ट्रॅव्हल पार्टनर्स आणि इतर ब्रँड्ससोबत पार्टनरशिपद्वारे मोठं उत्पन्न मिळतं.
खाण्याचे पदार्थ, पेये, आणि इतर सुविधा स्टेडियममध्ये विकून संघ अतिरिक्त कमाई करतो.
IPL मध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या संघांना प्राइज मनी मिळते. स्थानानुसार संघांमध्ये ही रक्कम विभागली जाते.
IPL संघ इंटरव्ह्यू, चॅरिटी मॅचेस, डिजिटल कंटेंट इत्यादींद्वारे देखील उत्पन्न मिळवतात.