Aarti Badade
ताजमहाल आणि पेठ्याचा इतिहास एकमेकांशी घट्ट जोडलेला आहे.
शाहजहानने स्वच्छ, पांढरट गोड पदार्थ तयार करण्याचा आदेश दिला आणि पेठ्याचा जन्म झाला.
कामगारांना काम करताना ऊर्जा मिळावी म्हणून त्यांना पेठा खायला दिला जात होता.
२२ वर्ष डाळ-रोटी खाल्ल्याने कामगार कंटाळले, मग काहीतरी वेगळं बनवण्याची मागणी झाली.
असे सांगितले जाते की, उस्ताद ईसा एका पीरकडे गेले, ध्यान करून पीरने पेठ्याची रेसिपी दिली.
पांढऱ्या भोपळ्याचे तुकडे पाण्यात उकळून त्यात साखर टाकून तयार केला जायचा पेठा.
पांढरा, गुलाब, पान, केशर, बदाम, पिस्ता, गुलकंद, वेलची असे अनेक स्वाद असेलला विविध प्रकारचे पेठे मिळतात.
पेठ्याचा व्यवसाय आज भारतभर पसरला असून तो आग्र्याची एक खास ओळख बनली आहे.