Shiv Jayanti 2026: आजच्या पिढीने शिवरायांकडून शिकाव्या अशा 7 गोष्टी

Anushka Tapshalkar

शिवजयंती 2026

दरवर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे शिवजयंती साजरी केली जाते. हा दिवस आपल्या इतिहासातील महान योद्धा, नेता आणि आदर्श व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्याची संधी आहे.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

नवीन पिढी (GEN Z) साठी संदेश

आजच्या तरुणांनी नेतृत्व, आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि नैतिकतेचे धडे शिकणे गरजेचे आहे. शिवरायांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन व्यक्तिमत्व आणि सामाजिक जबाबदारी विकसित करता येते.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

नेतृत्व (Leadership)

शिवरायांनी उत्कृष्ट नेतृत्वगुणांच्या जोरावर स्वराज्याची पायाभरणी केली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणून ध्येय प्राप्त करण्यास प्रवृत्त केले. ते फक्त आदेश देत नव्हते, तर स्वतः पुढे उभे राहून मार्गदर्शन करणारे नेता होते.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

आत्मविश्वास (Self-Confidence)

शिवरायांना स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास होता. संकटाच्या परिस्थितीतही त्यांनी आत्मविश्वास ढळू दिला नाही. प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने निर्णय घेण्याची त्यांची क्षमता प्रेरणादायी आहे.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

दूरदृष्टी (Vision)

शिवरायांची दूरदृष्टी अद्वितीय होती. भविष्यातील संधी आणि आव्हानांचा अचूक अंदाज घेऊन तयारी करणे त्यांना जमत होते. दीर्घकालीन परिणाम विचारात घेऊन योजना आखण्याची त्यांची पद्धत आदर्श आहे.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

टीमवर्क (Teamwork)

शिवरायांनी सहकाऱ्यांसोबत एकजुटीने काम केले. प्रत्येकाला त्यांच्या कौशल्यानुसार जबाबदाऱ्या सोपवल्या. योग्य व्यक्तीला योग्य काम देण्याची कला त्यांना अवगत होती.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

पद्धतशीर नियोजन (Systematic Planning)

महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने टप्पे आखले होते. या प्रत्येक टप्प्याच्या यशस्वीतेसाठी महाराजांच्या नियोजन कौशल्याचा विशेष धडा आपल्याला मिळतो.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

स्त्री-सन्मान (Respect for Women)

छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा सन्मान राखण्यास अत्यंत महत्त्व देत. युद्धाच्या वेळी शत्रूच्या स्त्रिया किंवा सामान्य नागरिकांचा अपमान होऊ नये, असे त्यांनी आदेश दिले होते.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

नैतिकता (Ethics)

रयतेवर अन्याय होणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सत्यनिष्ठा आणि न्यायाचे पालन हेच त्यांचे मार्गदर्शक तत्त्व होते.

7 Life Lessons Every Gen Z Must Learn from Shivaji Maharaj

|

sakal

Shiv Jayanti 2026: शिवाजी महाराजांच्या 'या' योजनेमुळे महाराष्ट्रातल्या नापीक जमिनी पिकाऊ झाल्या

Shivaji Maharaja's Agricultural Policies | sakal
आणखी वाचा