Anushka Tapshalkar
शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना विशेष महत्त्व देण्यात आले. नापीक जमिनी पिकाऊ करण्यासाठी मोठ्या सवलती दिल्या गेल्या, जेणेकरून शेतीचा विकास होईल.
ज्या शेतकऱ्यांनी पडीत जमीन लागवडीखाली आणली, त्यांना पहिल्या पाच वर्षांसाठी संपूर्ण करमाफी देण्यात आली. त्यानंतर हळूहळू कर वाढवण्यात आला.
झाडी असलेल्या जागा शेतीस उपयुक्त करण्यासाठी खत, माती टाकण्यास आणि पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्यात आले.
नद्यांच्या प्रवाहामुळे अदृश्य झालेल्या जमिनींना शेतीयोग्य करण्यासाठी बांध घालण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांना सवलती देण्यात आल्या.
गाव वसवण्यासाठी शेतकऱ्यांना गुरेढोरे, बैल पुरवले गेले. शिवाय, शेती सुरू करण्यासाठी सुरुवातीला धान्य देऊन त्यांना स्थिरस्थावर केले गेले.
ज्या शेतकऱ्यांना दुष्काळामुळे स्थलांतर करावे लागले, त्यांना परत आणून पुन्हा शेती करण्यास उद्युक्त करण्यासाठी करमाफी देण्यात आली.
लष्करी हालचाली, टोळधाड, रोगराई आणि स्वाऱ्या यांमुळे शेतीचे नुकसान होई. शिवाजी महाराजांनी हे संकट दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
गावांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी स्वराज्यात मजबूत संरक्षण व्यवस्था तयार करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला.
शिवाजी महाराजांचे धोरण केवळ करमाफीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी शेतकऱ्यांचे संरक्षणही सुनिश्चित केले. त्यांच्या काळात शेतकरी निर्भयपणे शेती करू शकत होते.