Anushka Tapshalkar
शरीरात लोह कमी असेल तर टाळूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केस झपाट्याने गळू लागतात. आहारात पालक, बीटरूट, खजूर, गूळ, रताळं, डाळिंब यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.
Iron Deficiency
sakal
व्हिटॅमिन D कमी झालं की केसांच्या फॉलिकल्सची कार्यक्षमता घटते. नवीन केस तयार होणं मंदावते आणि केस पातळ वाटू लागतात. म्हणून रोज १५–२० मिनिटे उन्हात फिरा, पनीर, फोर्टिफाइड दूध, मशरूम, अंडी खा.
Vitamin D Deficiency
Sak
बायोटिनच्या अभावामुळे केराटिनची घट होते. त्यामुळे केस कमजोर, तुटणारे आणि बेजान दिसू लागतात. आहारात बदाम, अक्रोड, रताळे, सोया पदार्थ, होल ग्रेन्स समाविष्ट करा.
Biotin Deficiency
sakal
झिंकची कमतरता असल्यास स्कॅल्पची दुरुस्ती नीट होत नाही, कोंडा वाढतो आणि केस सहज गळतात. आहारात भोपळ्याच्या बिया, तीळ, चणे, दही, काजू समावेश करा.
Zinc Deficiency
sakal
केसांचा मुख्य घटक प्रोटीन आहे. आहारात प्रोटीन कमी असेल तर केस पातळ, नाजूक होतात आणि तुटतात. आहारात पनीर, डाळी, टोफू, दही, मोड आलेली कडधान्यं खा.
Protein Deficiency
sakal
थायरॉईड किंवा अन्य हार्मोनल बदलांमुळे केसांची वाढ थांबून केस गळणे वाढते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून योग्य उपचार घेणे उपयोगी ठरते.
ताण वाढला की केसांच्या वाढीचे नैसर्गिक चक्र बिघडते, ज्यामुळे केस गळती अचानक वाढू शकते. मेडिटेशन, योगा, आणि रोज किमान ३० मिनिटे हलका व्यायाम केल्याने हे टाळता येते किंवा नियंत्रणात ठेवता येते.
Over Stress
sakal
Homemade Drinks For Growth
sakal